26 January, 2006

रे जीवना ‍- दै. सकाळमध्ये प्रवीण दवणे यांची नवी लेखमाला

मराठी मधील एक नामवंत कवी आणि गीतकार, प्रवीण दवणे, यांची दै. सकाळमध्ये "रे जीवना" हि नवीन लेखमाला सुरू झाली आहे. यापुर्वी त्यांच्या दै. लोकसत्तामधील "सावर रे", दै. सकाळमधील " थेंभातलं आभाळ" या लेखमाला गाजल्या आहेत. राजहंस प्रकाशनने "सावर रे" या लेखांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द केला आहे.

आपण "रे जीवना" ही लेखमाला दै. सकाळच्या "दिनविशेष" या सदरात, (http://www.esakal.com/today/dinavish.html या संकेतस्थळावर) वाचु शकता.

24 January, 2006

घरच्या पिचवरचा सचिन

लोकसत्ताच्या "चतुरंग" पुरवणीत, द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेला "घरच्या पिचवरचा सचिन" हा सचिन तेंडुलकरवरचा खास लेख आला आहे. आपण तो http://www.loksatta.com/daily/20060121/chchou.htm या संकेत स्थळावर वाचु शकता.

मराठीमध्ये पोस्टींग कसे कराल आणि लेख कसे वाचाल?

मराठीमध्ये पोस्टींग करण्यासाठी कृपया तख्ती एडीटर (http://www.geocities.com/hanu_man_ji/) या संकेतस्थळावरुन डाउनलोड करा.
या एडीटरमध्ये टाईप करा आणि पेस्ट करुन ब्लाँगमध्ये पोस्ट करा.

विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

आधुनिक मराठी काव्यक्षेत्रातील कवी विंदा करंदीकर यांना २००३ सालासाठी देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
यापुर्वी मराठी साहित्यात ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर ‍(१९७४) आणि वि. वा. शिरवाडकर (१९८७) यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.