26 January, 2006

रे जीवना ‍- दै. सकाळमध्ये प्रवीण दवणे यांची नवी लेखमाला

मराठी मधील एक नामवंत कवी आणि गीतकार, प्रवीण दवणे, यांची दै. सकाळमध्ये "रे जीवना" हि नवीन लेखमाला सुरू झाली आहे. यापुर्वी त्यांच्या दै. लोकसत्तामधील "सावर रे", दै. सकाळमधील " थेंभातलं आभाळ" या लेखमाला गाजल्या आहेत. राजहंस प्रकाशनने "सावर रे" या लेखांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द केला आहे.

आपण "रे जीवना" ही लेखमाला दै. सकाळच्या "दिनविशेष" या सदरात, (http://www.esakal.com/today/dinavish.html या संकेतस्थळावर) वाचु शकता.

1 comment:

Nandan said...

प्रवीण दवणेंच्या लेखमालेचा दुवा येथे दिल्याबद्दल आभार. अशाच वाचनीय लेखांचे दुवे आपण देत रहाल अशी आशा करतो.